मराठवाड्यात कोरोना मुळे शेतीमालाला फटका त्यात अजून या कारणाने शेतकऱ्यांचे नुकसान

Foto
जालना :  सध्याच्या कोरोना मुळे अनके शेतमालाचा भाव उतरला असून त्यात  अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे पिकांचे झालेले आहेत. नुकसान पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे नुकसान भरपाईदेण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.  जालना जिल्ह्याला सलग दोन दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं झोडपून काढले आहे. त्यामुळे गहू ज्वारीसह द्राक्ष, मोसंबी अश्या अनेक फळबागांचे मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
परतूर तालुक्यातील वाटूर, पिंपरखेडा आणि वाढोणा व बदनापुर मधील वाल्हा कंडारी सोमठाणा या भागात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली होती. त्यामुळं परिसरातील भाजीपाल्यासह रब्बी पिकांचं नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची पाहणी करून त्यांचे लवकरत लवकर पंचनामे करून  व शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर करावी. अशी मागणी सर्व सामान्य शेतकरी करत आहे.